जुलिया स्टाइल्स

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जुलिया स्टाइल्स

जुलिया ओ'हारा स्टाइल्स (२८ मार्च, १९८१:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेत्री आहे. न्यू यॉर्क शहरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या, स्टाइल्सने वयाच्या ११ व्या वर्षी न्यू यॉर्कच्या ला मामा एक्सपेरिमेंटल थिएटर क्लबचा भाग म्हणून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिचे चित्रपट पदार्पण हे आय लव्ह यू, आय लव्ह यू नॉट (१९९६) मधील एका छोट्या भूमिके सोबत झाले. त्यानंतर विकएड(१९९८) मध्ये तिची मुख्य भूमिका होती ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा कार्लोवी व्हॅरी फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळाला होता. १० थिंग्ज आय हेट अबाउट यू (१९९९), डाउन टू यू (२०००), आणि सेव्ह द लास्ट डान्स (२००१) यांसारख्या किशोरवयीन चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांमुळे ती प्रसिद्ध झाली. तिला एक टीन चॉईस अवॉर्ड आणि दोन एमटीव्ही मूव्ही अवॉर्ड्स, तसेच गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि प्राइमटाइम एमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आहे.

स्टाइल्सने द बिझनेस ऑफ स्ट्रेंजर्स (२००१), मोना लिसा स्माईल (२००३),द ओमेन (२००६) आणि बॉर्न फ्रँचायझीमध्ये निकी पार्सन्सच्या भूमिकेमुळे ती जगभरातील प्रेक्षकांना ओळखली गेली. तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांमध्ये हॅम्लेट (२०००), स्टेट अँड मेन (२०००), ए गाय थिंग (२००२), कॅरोलिना (२००३), द क्राय ऑफ द आउल (२००९), सिल्व्हर लाइनिंग्ज प्लेबुक (२०१२), आउट ऑफ द डार्क (२०१४) हे आहे.

चित्रपटा सोडून, स्टाइल्सने डेक्सटर (२०१०) च्या पाचव्या सत्रामध्ये लुमेन पियर्सची भूमिका केली, व सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब आणि उत्कृष्ट पाहुण्या अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमीसाठी नामांकन मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →