लेना (रशियन: Ле́на, साखा: Өлүөнэ) ही रशियाच्या सायबेरिया प्रदेशामधील तीन विशाल नद्यांपैकी एक नदी आहे (इतर दोन नद्या: ओब व येनिसे). लेना नदी बैकाल सरोवराच्या उत्तरेकडील बैकाल पर्वतरांगेत उगम पावते. तेथून ईशान्येकडे व उत्तरेकडे वाहत जाऊन ही नदी आर्क्टिक महासागराला मिळते. ४,४७२ किमी लांबी असलेली लेना ही जगातील नवव्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे.
साखा प्रजासत्ताकामधील याकुत्स्क हे लेनावरील सर्वात मोठे शहर आहे.
लेना नदी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!