साखा प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Саха́ (Яку́тия); साखा: Саха Өрөспүүбүлүкэтэ) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. रशियाच्या पूर्व भागात सायबेरियामध्ये ३०,८३,५२३ चौरस किमी क्षेत्रफळाच्या जमिनीवर वसलेला साखा हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. जर वेगळा देश असता तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने साखाचा क्रमांक भारताच्या खाली व आर्जेन्टिनाच्या वर लागला असता. साखा प्रजासत्ताकाची लोकसंख्या केवळ ९.५ लाख असून ह्यांपैकी १/३ लोक राजधानी व प्रमुख शहर याकुत्स्क येथे वास्तव्य करतात.
लेना ही येथील प्रमुख नदी असून बव्हंशी वाहतूक नदीद्वारे केली जाते. साखाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागराचे लापतेव व पूर्व सायबेरियन हे दोन समुद्र आहेत.
साखा प्रजासत्ताक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.