लँकेशायर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लँकेशायर

लँकेशायर (इंग्लिश: Lancashire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस कंब्रिया, ईशान्येस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस वेस्ट यॉर्कशायर, दक्षिणेस ग्रेटर मँचेस्टर व नैर्ऋत्येस मर्सीसाइड ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहे. १९७४ साली काउंट्यांची पुनर्रचना होण्याअगोदर लिव्हरपूल व मँचेस्टर ही मोठी शहरे लँकेशायरचा भाग होती.

येथील लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →