कंब्रिया (इंग्लिश: Cumbria) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस स्कॉटलंड, ईशान्येस नॉर्थअंबरलॅंड, आग्नेयेस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस ड्युरॅम, दक्षिणेस लॅंकेशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहेत.
१९७४ साली अस्तित्वात आलेल्या व मुख्यत: ग्रामीण स्वरूपाच्या काउंटीमधील लोकवस्ती इंग्लंडमध्ये सर्वात तुरळक आहे. येथील प्रामुख्याने डोंगराळ भूभाग निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
कंब्रिया
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.