हँपशायर

या विषयावर तज्ञ बना.

हँपशायर

हँपशायर (इंग्लिश: Hampshire; लेखनभेद: हॅम्पशायर) ही इंग्लंडमधील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. सुमारे १७.७ लाख लोकसंख्या असलेली हँपशायर ही इंग्लंडमधील पाचव्या क्रमांकाच्या लोकसंख्येची काउंटी आहे. साउथहँप्टन व पोर्टस्मथ ही ब्रिटनमधील दोन मोठी शहरे ह्याच काउंटीचा भाग आहेत.

१७व्या शतकामध्ये अमेरिकेकडे स्थलांतर करणाऱ्या ब्रिटिश प्रवाशांचे हँपशायर हे प्रमुख गंतव्यस्थान होते. ह्या प्रित्यर्थ अमेरिकेच्या एका राज्याला न्यू हॅम्पशायर हे नाव दिले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →