डॉर्सेट ही इंग्लंडची एक काउंटी आहे. डॉर्सेट इंग्लंडच्या नैऋत्य भागामध्ये वसलेली असून तिच्या दक्षिणेला इंग्लिश खाडी, पश्चिमेला डेव्हॉन, ईशान्येला विल्टशायर, वायव्येला सॉमरसेट तर पूर्वेला हॅम्पशायर काउंटी आहेत. क्षेत्रफळाच्या बाबतीत डॉर्सेटचा इंग्लंडमध्ये २०वा तर लोकसंख्येच्या बाबतीत ३२वा क्रमांक लागतो.
ही काउंटी मुख्यतः ग्रामीण असून येथील लोकवस्ती तुरळक आहे. डॉर्चेस्टर हे डॉर्सेटचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
डॉर्सेट
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.