रोहित पाटील

या विषयातील रहस्ये उलगडा.

रोहित रावसाहेब पाटील (४ जुलै, १९९९ - ) हे महाराष्ट्रातील एक -भारतीय राजकारणी आहेत. हे२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे महाराष्ट्राच्या १५व्या विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळी पाटील हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण सदस्य होते.

पाटील यांचा जन्म महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि सुमन पाटील यांच्या पोटी झाला. त्यांनी मुंबईतील एनएमआयएमएस येथून बीबीए पूर्ण केले.

पाटील यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे निवडणूक लढवली. त्यांना १२८,४०३ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि सांगलीचे माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजयकाका पाटील यांचा २७,६४४ मतांनी पराभव केला. संजयकाका हे त्यांच्या वडिलांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →