रोबोट शालू

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रोबोट शालू

रोबोट शालू’ हा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए.आई. असलेला भारतीय बहुभाषिक यंत्रमानव आहे. ‘शालू’ हा केंद्रीय विद्यालय, मुंबई, येथे संगणक विज्ञान शिक्षक, दिनेश पटेल यांनी विकसित केला आहे. ‘शालू’ रोबोट ९ भारतीय भाषांमध्ये (हिंदी, मराठी, बंगाली,भोजपुरी इत्यादी ) आणि ३८ परदेशी भाषा (इंग्रजी, जपानी, जर्मन इत्यादी) मध्ये बोलू शकतो. दिनेश पटेल यांनी सांगितले की हा रोबोट अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक व इतर साहित्याचा बनलेला आहे आणि खर्च कमी ठेवण्यासाठी कोणतीही उपकरणे अथवा थ्रीडी-प्रिंट केलेली नाहीत. हा रोबो तयार करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला असून पन्नास हजार (५०,०००) रुपयांचा खर्च आला आहे. बऱ्याच रास्पबेरी पाई आणि आरडुइनो मायक्रोकंट्रोलरचा उपयोग रोबोटमध्ये मोजण्यासाठी केले गेले आहेत, आणि फिथन, टेन्सरफ्लो, नॅचरल लँग्वेज टूलकिट (एनएलटीके) इत्यादी मुक्त स्रोत फक्त सॉफ्टवेर प्रोग्रामिंगसाठी वापरले गेले आहेत. तसेच रोबोटच्या पुढील आवृत्तीच्या विकासाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →