नैतिक मूल्यांचे शिक्षणाची तत्संबधी शिस्त आणि नियमनाची जबाबदारी पालक सांभाळत असतात.हे करतानासुद्धा पाल्यास अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करणे आणि स्वतःकरिता चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याची निर्णयक्षमता निर्माणकरण्या करिता पालक पाल्यांची पाठराखण करत असतात.
मुक्त लोकशाही समाजांमध्ये आपली बुद्धी वापरून बरेवाईट ठरवण्याचे आणि निवड स्वातंत्र्य वापरण्याचे आणि अभिव्यक्ती स्वतांत्र्याची कक्षा अविष्कार स्वातंत्र्य अधिकाधिक जोपासेल हे पहाणे अभिप्रेत असते.पण समाजातील काही घटक इतर व्यक्ती किंवा इतर समाज घटकांवर त्यांचे स्वांत्र्य नाकारत स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करतात तेव्हा त्यास नैतिक सुभेदारी असे म्हणले जाते. नैतिक सुभेदारीची अमलबजावणीकरण्याकरिता बऱ्याचदा उपद्रव मुल्याचा आणि सार्वजनिक उपद्रवाचा उपयोग केला जातो.
नैतिक पाठराखण
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.