रेवती लेले

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रेवती लेले (२३ जानेवारी, १९९५ - ) एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झी युवावरील गुलमोहर नावाच्या मालिकेने केली. नंतर तिने विठू माऊली, वर्तुळ आणि ललित 205 इत्यादी मराठी मालिकांमध्ये काम केले.

२०२० मध्ये तिने कलर्स मराठीच्या दूरचित्रवाणी मालिका स्वामिनी मध्ये रमाबाई पेशव्यांची भूमिका साकारली. 2021 मध्ये, तिने स्टारप्लसवरील "आपकी नज़रों ने समझा" या मालिकेद्वारे हिंदी दूरचित्रवाणी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला, ज्यामध्ये तिने बांसुरीची भूमिका साकारली.

लेले या कथक नृत्यांगना देखील आहेत. त्यांनी मार्गदर्शक टीना तांबे यांचा बरोबर आणि भारत आणि परदेशातील अनेक नृत्य महोत्सवांमध्ये नृत्याविष्कार सादर केले आहे. फिरोज अब्बास खान दिग्दर्शित मुघल-ए-आझम (म्युझिकल) या ब्रॉडवे शैलीचा अविष्काराचा त्या एक भाग होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →