टीना तांबे ह्या जयपूर-अत्रौली घराणे शैलीच्या कथक नृत्यांगना तथा कोरिओग्राफर आहेत. तांबे या गुरू उमा डोगरा यांच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आहेत. त्या वयाच्या सहाव्या वर्षापासून कथक नृत्य करत आहेत. त्या कथक नृत्याचे शिक्षण देतात. तसेच कथक नृत्यांचे दिग्दर्शनसुद्धा करतात. त्यांनी देशातल्या अनेक प्रमुख नृत्य महोत्सवात आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्याविष्कार केले आहे. तांबे यांना इ.स. २००९ मध्ये नालंदा डांस एंड रिसर्च अकादमी, मुंबई द्वारा नालंदा नृत्य निपुण उपाधिने सन्मानित करण्यात आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टीना तांबे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.