कुमुदिनी लाखिया (१७ मे, १९३० - १२ एप्रिल, २०२५) ह्या गुजरातच्या अहमदाबाद येथे स्थित भारतीय कथक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक होत्या. त्यांनी अहमदाबाद येथे १९६७ मध्ये भारतीय नृत्य व संगीताला प्रेरणा व पुढावा देण्यासाठी कदंब स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिक ही संस्था स्थापन केली.
समकालीन कथक नृत्यातील प्रणेत्या म्हणून त्या १९६० च्या दशकात नावाजल्या होत्या. एकट्या नर्तकाने सादर करण्याच्या कथकच्या स्वरूपाला बदलून समूहीक नृत्य प्रस्तूत करण्याची सुरुवात लाखिया यांनी केली. तसेच पारंपरिक कथा कथनाच्या रीतीला बदलून समकालीन कथासंग्रह जोडणे यासारखे नवकल्पनादेखील त्यांनी दिल्या.
कुमुदिनी लाखिया
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?