रोहिणी भाटे

या विषयावर तज्ञ बना.

रोहिणी भाटे (जन्म : पाटणा, १४ नोव्हेंबर १९२४; - पुणे, १० ऑक्टोबर २००८) या मराठी कथक नर्तकी होत्या.

ज्या काळात भारतात पांढरपेशा घरातील मुलींनी स्टेजवर नृत्य करणे ही प्रथा समाजमान्य नव्हती, त्या काळात एका मराठी मुलीने नृत्य करणे ही गोष्ट धारिष्ट्याचीच होती. पण एकदा घेतलेला निर्णय रोहिणी भाटे यांनी मरेपर्यंत निभावला. त्या बुद्धिमान तर होत्याच शिवाय त्या कविताही करीत. गाण्याचेही त्यांना अंग होते. या सर्वांचा उपयोग त्यांना नृत्यसाधनेसाठी झाला.

रोहिणी भाटे यांनी लखनौ घराण्याचे कथक नर्तक लच्छूमहाराज व जयपूर घराण्याचे नर्तक मोहनराव कल्याणपूरकर यांच्याकडे कथक नृत्याचे शिक्षण घेतले होते.. त्यांनी इ.स. १९७२ च्या सुमारास पुण्यात नृत्यभारती नावाची कथक नृत्यप्रशिक्षण अकादमी स्थापली. नृत्यकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाने इ.स. १९७७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने, तर इ.स. १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवले गेले.. नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने इ.स. १९७९ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान केला. .

रोहिणी भाटे यांनी लिहिलेले लहेजा या नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये प्राजक्ता अत्रे, ऋजुता सोमण, मराठी चित्रपट अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांचा समावेश आहे.

पुढील पिढीतील नर्तकी शमा भाटे या रोहिणीबाईंच्या स्नुषा (सूनबाई) आहेत.

गायक प्रभाकर जठार हे रोहिणी भाटे यांचे द्वितीय पती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →