रूचिरा गुप्ता या एक पत्रकार आणि कार्यकर्त्या आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आणि लैंगिक तस्करी निर्मूलनासाठी काम करणाऱ्या अपने ऍप या गैर-सरकारी संस्थेच्या त्या संस्थापक आहेत.
२००९ मध्ये, गुप्ता यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी स्थापन केलेल्या क्लिंटन फाऊंडेशनद्वारे नागरी समाजातील नेतृत्वासाठी क्लिंटन ग्लोबल सिटीझन अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच फ्रान्स सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत प्रतिष्ठित शेवेलियर डी लॉर्डे डु मेरिटे (नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट) पुरस्कार २०१७ मध्ये त्यांना प्रदान केला.
रूचिरा गुप्ता
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.