जळगाव बलात्कार प्रकरण हे महाराष्ट्र राज्यातील जळगाव येथे घडलेले मानवी तस्करी, बलात्कार, खून आणि लैंगिक गुलामगिरीचे एक प्रमुख प्रकरण होते.
जुलै १९९४ मध्ये ह्या गुन्ह्यांचा तपशील समोर आला. त्या महिला, ज्यांपैकी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थिनी होत्या, त्यांना नग्न फोटोंच्या बदल्यात विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते व नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. काही पुरुष महिलांचे आक्षेपार्ह स्थितीत असलेले फोटो काढत असत, ज्यात लपवलेल्या कॅमेऱ्यांनी काढलेले नग्न फोटो देखील होते. नंतर पीडितांना फोटो दाखवले जायचे आणि स्थानिक हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले जायचे जिथे त्यांच्यावर बलात्कार केला जायचा. फोटोंसाठी पोज दिल्यानंतर आणि ब्लॅकमेल केल्यानंतर अनेक महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले होते.
ह्या प्रकरणात जवळपास ५०० महिला बळी पडल्याचे उघड झाले व त्यापैकी अंदाजे १०० महिलांवर बलात्कार झाले होते. नंतर असे उघड झाले की बळींपैकी दोघांची हत्या देखील करण्यात आली होती. लैंगिक अत्याचार पीडितेच्या वतीने स्थानिक रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने २५ जून १९९४ रोजी पहिली तक्रार दाखल केली होती.
पीडित महिला सुरुवातीला पुढे येण्यास कचरत होत्या किंवा नंतर काहींनी त्यांनी पोलिसांना दिलेले जबाब परत घेतले. ह्यामुळे अनेक लोकांवर लैंगिक अत्याचाराऐवजी अश्लील साहित्य बाळगल्याचा आरोप लावण्यात आला.
जळगाव बलात्कार प्रकरण
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!