रिपब्लिकन सेना हा एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी २१ नोव्हेंबर १९९८ रोजी केली. आनंदराज आंबेडकर हे यशवंत आंबेडकर यांचा मुलगा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारेवर अर्थात आंबेडकरवादाच्या आधारित आहे. हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आहे. रिपब्लिकन सेनेच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर, मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर कब्जा केला होता. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची (समानतेचा पुतळा) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीवर प्रकाश टाकला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी बरोबरही पक्षाने काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिपब्लिकन सेना
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.