वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंचितांचा पक्ष, VBA) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे, ज्यांची स्थापना प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. २४ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीची भारतातील 'राजकीय पक्ष' म्हणून नोंदणी झाली. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत.
२०१९ मध्ये, या पक्षाने एआयएमआयएम पक्षासह १७व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.
या युतीतील इम्तियाज जलील हा एकमेव AIMIMचा उमेदवार विजयी झाला, तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंबआने ३७ लाख (७.६४%) मते मिळवली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने २८८ पैकी २३४ जागांवर आपले उमेदवार उभे केले, मात्र हे सर्वजण पराभूत झाले. यावेळी वंचित बहुजन आघाडीने २५ लाख मतदान (४.६%) मिळाले. १२ लाख मतांनी वंचितचे मताधिक्य घटले.
वंचित बहुजन आघाडी
या विषयातील रहस्ये उलगडा.