रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला हा रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस या प्रतिमुद्रण (फोटोकॉपी) करणाऱ्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या आवारातील करारित प्राधिकृत दुकानाविरुद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, टेलर अँड फ्रांसिस या प्रकाशकांनी दिल्ली उच्चन्यायालयात चालवलेला प्रताधिकार खटला आहे.
रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस कागदपत्रांच्या प्रती पुरवण्या सोबतच प्राध्यापकांच्या निर्देशानुरूप विद्यार्थ्यांना अभ्याससंचिका (कोर्सपॅक) उपलब्ध करून देण्याची सेवा ठराविक दराने पुरवतात. या अभ्याससंचिका प्रकाशकांच्या प्रताधिकारीत पुस्तकांवर आधारित असल्यामुळे प्रकाशकांचे आर्थिक नुकसान होते हा वादी प्रकाशकांचा दावा आहे, तर सदर प्रतिमुद्रणांना प्रताधिकार कायद्याच्या उचित वापर नियमांनुसार (फेर डिल) मुभा असल्याचे प्रतिवादी रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस आणि इतर प्रतिवादींचे म्हणणे आहे.
रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटला
यामागील विज्ञान आणि इतिहास.