सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कायदा आणि न्यायव्यवहाराच्या परिभाषेनुसार, सद्भावनेतून कृती (इंग्रजी bona fide action in good faith) म्हणजे नुकसान अथवा फसवणूक करण्याचा उद्देश नसलेली, सद्भावनेने केलेली रास्त, प्रामाणिक कृती होय.

विविध कायद्यांपैकी काही कायद्यात, काही विवक्षीत कृती सद्भावनेने केल्या गेल्यास चुकीच्या गृहीत धरल्या जात नाहीत अथवा कृती सद्भावनेने केली गेल्याच्या बचावास न्यायालये प्रत्येक मामल्याचा विशीष्ट परिस्थिती लक्षात घेऊन स्विकारू शकतात. अंकित मजमुदार आणि नंदन कामथ यांच्या लेखातील मतानुसार कायदा माहित नसणे हा बचाव होऊ शकत नाही मात्र एखादी विशीष्ट वस्तुस्थिती माहित नसणे हा ग्राह्य युक्तीवाद होऊ शकतो.

भारतीय दंड संहितेचे कलम ५२ सद्भावनेचा युक्तीवाद ग्राह्य होण्यासाठी सुयोग्य (रास्त, वाजवी, सयुक्तिक) दक्षता आणि काळजी घेतली जाण्याची अपेक्षा करते. एखादी गोष्ट/कृती चुकीने घडली हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी बचावपक्षाची असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →