मुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे, त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात.
बॉलीवूडला औपचारिकपणे हिंदी सिनेमा म्हणून संबोधले जाते, परंतु या हिंदी चित्रपटांत काव्यात्मक उर्दू शब्दांचा वारंवार वापर सामान्य आहे. संवाद आणि गाण्यांमध्येही भारतीय इंग्रजीचा वाढता वापर आहे. इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार किंवा अगदी संपूर्ण वाक्यांसह संवाद दर्शविणारे चित्रपट दुर्लभ नाहीत.
बॉलीवूड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.