भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम २१ अनुसार, 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे सुद्धा, 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ३० परवाने देण्यास अनुमती देते ज्यास कलम १९ची उपकलमे अंशतः लागू होतात. भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम ७८ उपलम (२) क्लॉज (b) परवान्यांच्या स्वरूपाच्या बाबतीत केंद्रसरकारला नियम बनवण्यास अनुमती देते. असे नियम कॉपीराइट रूल्स २०१३ नियम क्रमांक ४ आणि ५ मध्ये नमुद केले गेले. यात , कॉपीराईट निबंधकांना अर्ज पाठवण्यासाठी Form I आणि प्रतिज्ञापत्राचे विहीत नमुने आणि प्रताधिकार त्यागाच्या जाहीर उद्घोषणेसोबत जोडावयाची माहिती दिली आहे.



(अनुवाद)

२१. प्रताधिकार त्यागाचा लेखकाचा अधिकार

(१) 'कामाचे लेखक' विहीत नमुन्यात कॉपीराइट निबंधक यांना सूचना देऊन, अथवा जाहीर उद्घोषणे द्वारे, 'कामात समाविष्ट' सर्व अथवा अंशतः अधिकारांचा त्याग करू शकतील आणि की ज्या नंतर, उप-कलम ३ मधील तरतुदींच्या आधीन राहून, सूचनेच्या दिवसा पासून संपुष्टात येतील.

(२) उपकलम १ खाली सूचना प्राप्त झाल्यानंतर, कॉपीराइट निबंधक, त्यांना सुयोग्य वाटेल अशा पद्धतीने अधिकृत राजपत्रात आणि अशा इतर पद्धतीने प्रकाशित करवतील.

(२A) कॉपीराइट निबंधक अधिकृत राजपत्रात सूचना प्रकाशित झाल्यापासून चौदा दिवसांचे आत कॉपीराइट कार्यालयाच्या अधिकृत संस्थळावर सूचना देतील की, ज्या सूचनेची सार्वजनिकरित्या उपलब्धता, तीनवर्षेपेक्षा कमी असणार नाही.

(3) 'कामा'बद्दलच्या प्रताधिकारातील कोणतेही अधिकार पूर्ण अथवा अंशतः त्यागण्याने, उपकलम (१) मध्ये नमुद संदर्भातील सूचना देण्याच्या तारखेस कोणत्याही व्यक्तीच्या प्रती विद्यमान असलेले कोणतेही अधिकार बाधीत होणार नाहीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →