इतर सजीवांप्रमाणे किंबहुना इतर सजीवापेक्षा अधिक चांगल्या रितीने अभिव्यक्ती ही मनुष्य प्राण्याची नैसर्गिक गरज अथवा प्रेरणा आहे. जगात लोकशाही आणि स्वातंत्र्य बळकट करण्याकरिता झालेल्या विविध चळवळींमुळे, तसेच बौद्धिक व न्यायिक चिकित्सांमधून अभिव्यक्तीस्वातंत्र्यास मूलभूत स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला आहे. तसेच, या स्वातंत्र्याच्या व्याख्येच्या कक्षा अधिकाधिक विस्तारित ठेवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचे महत्त्व भारतानेच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे.स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार असल्याचे कितीही गुणगान केले तरी इतर मूलभूत हक्कांप्रमाणेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याससुद्धा कायद्याच्या मर्यादेशी आणि सांस्कृतिक पारंपरिक वातावरणाशी सामना करावयास लागतो.अभिव्यक्तिस्वातंत्र्या ने नियमबद्ध होणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, त्याच्या विस्तारकक्षांचा व मर्यादांचा व्यक्ती, समूह, त्यांची स्थलकालसापेक्ष संस्कृती, इतर मूलभूत स्वातंत्र्यअधिकार, त्यांच्या हक्क-कर्तव्यांच्या संकल्पना आणि संबधित विविध कायदे यांवर परिणाम होत असतो.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा व्यक्तिगत स्वातंत्र्याप्रमाणेच लोकशाही मूल्यांवर आधारित मूलभूत मानवी अधिकार आहे. स्वतःस अभिव्यक्त करता येणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही स्वयंपूर्णतेसाठी किमान आवश्यकता असते. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विचार-स्वातंत्र्यासोबत घनिष्ठ नाते आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना वैचारिक आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य असल्याचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ मध्ये या स्वातंत्र्याचा पुनरूच्चार केला आहे. योगायोग असा की, मानवाधिकाराच्या वैश्विक घोषणापत्राच्याही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?