रामभद्राचार्य

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रामभद्राचार्य

जगद्गुरू रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत. ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत. हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत. अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात. ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे. त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते, व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.

त्यांनी कधीही अभ्यासासाठी किंवा रचना करण्यासाठी ब्रेल लिपी वापरली नाही.ते बहुभाषिक आहेत आणि 22 भाषा बोलतात. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यासह अनेक भाषांमध्ये तो एक छोटा कवी आणि निर्माता आहे. त्यांनी चार महाकाव्ये (दोन संस्कृत आणि दोन हिंदीत), रामचरितमानसवर एक हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील काव्यात्मक संस्कृत भाष्य आणि प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि) वरील संस्कृत भाष्य यासह 80 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथांची रचना केली. प्रमुख उपनिषद). ते तुलसीदासांवरील भारतातील सर्वोत्कृष्ट तज्ञांपैकी एक मानले जातात आणि तुलसी पीठाने प्रकाशित केलेल्या रामचरितमानसच्या अस्सल प्रतीचे ते संपादक आहेत. स्वामी रामभद्राचार्य हे रामायण आणि भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत – त्यांच्या कथा भारतातील आणि परदेशातील विविध शहरांमध्ये नियमितपणे आयोजित केल्या जातात आणि कथेचे कार्यक्रम संस्कार टीव्ही, सनातन टीव्ही इत्यादी चॅनेलवर प्रसारित केले जातात.

2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →