जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांगविश्वविद्यालय (संस्कृतभाषा: जगद्गुरूरामभद्राचार्यविकलाङ्गविश्वविद्यालयः), हे भारतातल्या उत्तर प्रदेश राज्यात चित्रकूट धाम येथे असलेले अपंगांसाठीचे विद्यापीठ आहे. हे अपंगांसाठीचे जगातील सर्वप्रथम विद्यापीठ आहे. या विदयापीठात संस्कृतभाषा, हिन्दीभाषा, आङ्ग्लभाषा, समाजशास्त्र, मनोविज्ञान, गानविद्या, चित्रकला, ललितकला, विशिष्टशिक्षण, शिक्षण, इतिवृत्त, संस्कृति एवं पुरातत्त्व, अभिकलित्र व सूचना विज्ञान, व्यावसायिकशिक्षा, विधि, अर्थशास्त्र, प्रोस्थेटिक्स व ओर्थोटिक्स सहित अनेक शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट डिग्री प्रदान केली जाते. प्रवेश फक्त चार प्रकारच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे – अंध , मूकबधिर, अस्थिविकलांग (पंगु अथवा भुजाहीन), व मानसिक विकलांग, ( भारत सरकारच्या विकलांगता अधिनियम १९९५ अनुसार) . या विदयापीठाचा उद्देश्य अपंग विद्यार्थ्यांना स्वतंत्र नागरिक व सक्षम मानव-संसाधन म्हणुन तयार करणे हा आहे. या विदयापीठातील सर्व सुविधा - म्हणजे वर्ग, विद्यार्थीवास, क्रीड़ासुविधा व् प्रयोगशाला इ. अत्यंत अपंग-अनुकूल आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जगद्गुरु रामभद्राचार्य दिव्यांग विद्यापीठ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.