राजेंद्र मल लोढा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

राजेंद्र मल लोढा

राजेंद्र मल लोढा तथा आर.एम. लोढा (२८ सप्टेंबर १९४९) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात देखील न्यायाधीश म्हणून काम केले आहे.

राजेंद्रमल लोधा यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (BCCI) गोंधळ निस्तरण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती. १४ जुलै २०१५ रोजी, लोढा यांच्या या समितीने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांना इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतून सट्टेबाजीच्या आरोपाखाली दोन वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले.

‘केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) म्हणजे सरकारी पिंजऱ्यातील पोपट’ हे लोढा यांचे विधान प्रसिद्ध आहे. हे वाक्य त्यांनी कथित कोळसा घोटाळा प्रकरणाच्या सुनावणीत २०१३ साली वापरले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →