राज ठाकरे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

राज ठाकरे

राज उर्फ स्वरराज श्रीकांत ठाकरे (जन्म:१४ जून, १९६८ - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा व हिंदुत्व यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. ठाकरे यांनी इ.स. २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तर प्रदेशी लोकांच्या मोठ्या संख्येने येण्याला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. याला ते "येणारे लोंढे" असा शब्द वापरत. या भूमिकेमुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →