पुष्पा भावे

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

प्रा. पुष्पा भावे माहेरच्या पुष्पा सरकार; (२६ मार्च, १९३९; - ३ ऑक्टोबर २०२०) ह्या एक स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार आहेत. भावे यांचे साहित्य-समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.

त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →