१९२० च्या दशकांत पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळात सात कवी व एक कवयित्री एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने काव्यलेखन करण्याचा प्रयोगही झाले. त्यांच्या या कवी मंडळाला 'सन टी क्लब' असे नामाभिधानही देण्यात आलेले होते.
मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाउन पोहोचली.
मंडळा कडून कविता वाचन, चर्चासत्र इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे.
हे मंडळ १९३५ पर्यंत कार्यरत होते.
मराठी कवितेतील सौंदर्यवादी धारा दृढमूल करण्यात आणि ती समाजाभिमुख करण्यात रविकिरण मंडळाचे श्रेय फार मोठे आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली.
लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या.
रविकिरण मंडळ
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.