अनंततनय

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

अनंततनय ऊर्फ दत्तात्रेय अनंत आपटे (जन्म : बडनेर भोलजी-जिल्हा बुलढाणा, इ.स. १८७५; - पुणे, ११ जून, इ.स.. १९२९) हे एक मराठी कवी होते. ह्यांचे मूळ गाव जुन्नर. स्कूल-फायनलपर्यंत शिकल्यावर त्यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे १२ वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्या काळात तेथील सत्पुरुष चंडिराममहाराज यांचे पद्यमय चरित्र त्यांनी लिहून प्रसिद्ध केले (१८९९) अनंततनय यांची बरीचशी कविता पुण्याच्या चित्रमयजगत्‌ मधून प्रसिद्ध झाली आहे.

इ.स. १९२०मध्ये पुणे येथे कवी आणि काव्यरसिक यांच्यासाठी स्थापन झालेल्या ’श्री महाराष्ट्र शारदामंदिरा’चे ते आधारस्तंभ होते. ह्या संस्थेच्या वतीने नवीन कवितेविषयी समाजात आवड निर्माण करणे, कवींच्या काव्यकृती प्रकाशित करणे, कवीची चरित्रविषयक माहिती मिळवून ती प्रसिद्ध करणे, काव्यग्रंथांचा संग्रह करणे, कविसंमेलने भरवणे, काव्यविषयक चर्चा घडवून आणणे, असे विविध उपक्रम अनंततनय यांनी केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →