रमिलाबेन बारा

थोडक्यात पण महत्त्वाचे.

रमिलाबेन बारा या भारतीय राजकारणी आणि राज्यसभेच्या सदस्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. बारा यांनी कला आणि शिक्षणात पदव्या मिळवल्या आहेत.

बारा यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपच्या उमेदवार म्हणून लढवल्या होत्या. तथापि, २००३ च्या निवडणुकीत एकदा वगळता सर्व प्रसंगी त्यांचा काँग्रेसकडून पराभव झाला. रमिलाबेन या गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचा आदिवासी चेहरा आहेत. त्या प्रदेश उपाध्यक्षा, माजी आमदार आणि आदिवासी विकास विभागाच्या अध्यक्षाही आहेत. २०१७ मध्ये खेडब्रह्मा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत त्या हरल्या होत्या. मार्च २०२०मध्ये, त्यांना गुजरातमधून राज्यसभेसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून नामांकन देण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →