द्रौपदी मुर्मू (जन्म: २० जून, १९५८) या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या.
२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला तर पहिल्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या (तरुण) सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. G
द्रौपदी मुर्मू
या विषयातील रहस्ये उलगडा.