अभय गणपतराय भारद्वाज (२ एप्रिल, १९५४:कंपाला, युगांडा - १ डिसेंबर, २०२०) हे एक भारतीय वकील आणि राजकारणी होते. हे गुजरातमधील राज्यसभेचे सदस्य होते. भारद्वाज भारतीय जनता पक्षाचे नेते होत व महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न होते. भारद्वाज यांनी १९९५ मध्ये राजकोट पश्चिममधून अपक्ष उमेदवार म्हणून गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते जिंकले नाहीत.
भारद्वाज यांचा जन्म २ एप्रिल, १९५४ रोजी युगांडा मध्ये झाला. तेथे राहणारे त्यांचे कुटुंब १९६९ मध्ये युगांडातील यादवीमुळे त्यांचे भारतात स्थलांतरित झाले.
२००२ च्या गुजरात दंगलीत झालेल्या गुलबर्ग सोसायटी खटल्यातील ते आरोपींचा बचाव करणारे वकील होते. एकाच सोसायटीमधील सुमारे ७० रहिवाशांची हत्या झाल्यावर त्याबद्दलच्या खटल्यात विशेष न्यायालयाने २०१६ मध्ये २४ आरोपींना दोषी ठरवले आणि ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली.
राजकोटचे जिल्हाधिकारी असताना माजी आयएएस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याविरुद्ध सत्तेचा गैरवापर केल्याच्या प्रकरणात त्यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले.
अभय भारद्वाज
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!