रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा इ.स. २०१० मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला मराठी चित्रपट आहे. रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री निशा परुलेकर यांनी साकारली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून बॉलीवुडचे प्रख्यात संकलक प्रकाश जाधव यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →