रमाई (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.

निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी रमाई चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →