रणथंभोर राष्ट्रीय उद्यान

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान

रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख व्याघ्रप्रकल्प आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील सवाई माधोपूर या जिल्ह्यात आहे व जयपूरपासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.

या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे चंबळ नदी वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध रणथंबोरचा किल्ला आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर वाल्मिक थापर यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, रानडुक्कर, सांबर, चितळ, गवा व नीलगाय यांचाही समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →