ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर हा महाराष्ट्रातील एक व्याघ्र पर्यटनस्थळ असून येथे वाघांची प्रचंड वसाहत आहे. हा व्याघ्र (राखीव) प्रकल्प हा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी वन्यजीव अभयारण्याचे ५०८.८५ किमी२क्षेत्र मिळून संयुक्तपणे व्याघ्रप्रकल्पाचा ज्या गाभा क्षेत्रात मोडतो, तोच मुख्य Critical Habitat क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी.२ आहे.



प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १,७२७ चौ.किमी. असून त्यातील १,१०२ चौ.किमी. हे संरक्षित क्षेत्र (बफर झोन) व उर्वरित ६२५ चौ.किमी. हे गाभा क्षेत्र (Core Zone) म्हणून ओळखले जाते.

सध्या घोषित व निर्माणाधीन घोडाझरी वन्यजीव अभयारण्य व कन्हाळगांव अभयारण्य यांचा समावेश यांत होतो.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना ई.स. १९५५ साली जेव्हा तो मध्य प्रांताचा भाग होता, तेव्हा झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे.



उद्यानात आढळणाऱ्या वाघ, रानकुत्रा, मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →