महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक WLP, 0614/C.R.153/F-1 दिनांक १५ मार्च २०२१ अन्वये कन्हारगांव वन्यजीव अभयारण्य स्थापन झाले.
याचे क्षेत्रफळ २६९.४०२ किमी२ अर्थात 15,333.88 Hectare आहे.
हे महाराष्ट्रातील ५०वे अभयारण्य म्हणून घोषित झाले.
पूर्वी हा भाग चंद्रपूर वनवृत्तातील मध्य चांदा वनमंडळांतर्गत तसेच FDCM मध्ये येत होता.
नविन अभयारण्याचे २ परीक्षेत्रात विभाजन प्रस्तावित असून अनुक्रमे
ढाबा
कोठारी
याठिकाणी तसेच सहाय्यक वनसंरक्षक, गोंडपिपरी येथे कार्यालये असतील व ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बफर क्षेत्रांतर्गत येते.
कन्हाळगांव वन्यजीव अभयारण्यांत एकूण 33 गावांचा समावेश असून ही गावे 18 ग्रामपंचायत/ गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट आहे.
कन्हाळगांव अभयारण्य
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?