कान्हा व्याघ्र प्रकल्प

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कान्हा व्याघ्र प्रकल्प

कान्हा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्रप्रकल्प राबविला गेलेले भारतातील मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. भारतात व्याघ्रप्रकल्प सर्वाधिक यशस्वी येथे ठरला, अशी या उद्यानाची ख्याती आहे. सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते लेखक रुडयार्ड किपलिंग यांची प्रसिद्ध जंगल बुक ही साहित्यकृती याच उद्यानावरू सुचली. हे जंगल १८७९ साली संरक्षित उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना १ जून १९५५ रोजी झाली . त्याअगोदर हे राष्ट्रीय उद्यान हलून आणि बंजर या दोन अभयारण्यांमध्ये विभाजित होते. आजचे राष्ट्रीय उद्यान हे मंडला व बालाघाट या मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. उद्यानाचे गाभा क्षेत्र व परिसर क्षेत्र मिळून एकूण १००९ चौ.किमी इतके क्षेत्र आहे. या उद्यानाचे सर्वात मोठे आकर्षण वाघ आहे. येथे वाघ दाखवण्याच्या अनेक सफरी आयोजित केल्या जातात व वाघांची संख्या जास्त असल्याने बहुतांशी हमखास वाघ दिसतो. वाघाबरोबरच येथील इतर वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या हे येथील वैशिष्ट्य आहे. इतर वन्यप्राण्यांमध्ये अस्वल , बाराशिंगा हरीण, भारतीय रानकुत्री ढोल अथवा भारतीय रानकुत्री, बिबट्या, चितळ, सांबर इत्यादी आहे. चितळांचेही सर्वाधिक प्रमाण येथे आढळून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →