मानस राष्ट्रीय उद्यान

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मानस राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील भारत-भूतान सीमेवरील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचे प्रमुख आकर्षण आहे येथील सोनेरी वानर व ढगाळ बिबट्या ज्याला इंग्रजीत Clouded Leopard असे म्हणतात. येथील सोनेरी वानर जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. त्याच बरोबर अनेक दुर्मिळ प्राणी व वनस्पतींसाठी हे माहेरघर आहे. या उद्यानाचे नाव येथील वाहणाऱ्या मानस नदीमुळे पडले आहे. मानस नदी ब्रम्हपुत्रा नदीची एक प्रमुख उपनदी आहे.

या उद्यानाची स्थापना १९२८ मध्ये झाली व याचे क्षेत्रफळ ३६० किमी वर्ग इतके आहे. याची १९७३ मध्ये व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषणा झाली. १९८५ मध्ये युनेस्कोतर्फे या उद्यानाची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड करण्यात आली, मुख्य कारण म्हणजे केवळ येथेच आढळणारे प्राणी व पक्षी. राष्ट्रीय उद्यान असले तरी सीमेवर असल्यामुळे चोरट्या शिकारीचा तसेच दहशतवाद्यांचा उपद्रव खूप आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →