राजस्थान (जुने नाव राजपुताना) हे पश्चिम भारतातील एक राज्य आहे. हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे. क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे व लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. हिंदी व राजस्थानी या येथील प्रमुख बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत. राजस्थानची साक्षरता ६७.०६ टक्के एवढी आहे.
उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे येथे शेतीचे प्रमाण कमी आहे. ज्वारी, मका, हरबरा व गहू ही येथील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत. या भागातून बनास, लुनी, घग्गर व चंबळ या नद्या वाहतात. राजस्थानचे मारवाड व मेवाड असे दोन विभाग आहेत.
राजस्थान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.