रचना बॅनर्जी

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

रचना बॅनर्जी

रचना बॅनर्जी (बांग्ला: রচনা বন্দ্যোপাধ্যায়, जन्म: २ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय अभिनेत्री व विद्यमान लोकसभा सदस्य आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये कामे करणाऱ्या बॅनर्जीने १९९९ सालच्या सूर्यवंशम या अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटातही अभिनय केला होता.

२०२४ लोकसभा निवडणुकीमध्ये रचना बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून हूगळी लोकसभा मतदारसंघामधून निवडून आली. २०२६ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीमध्ये तृणमूल पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या २८ पैकी २० खासदारांनी पक्षप्रमुख ममता बॅनर्जी ह्यांच्याविरुद्ध बंड पुकारून भारतीय राष्ट्रवादी जनता पक्ष नावाच्या पक्षामध्ये प्रवेश केला. ह्या २० लोकसभा सदस्यांपैकी रचना बॅनर्जी देखील एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →