युसुफ पठाण

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

युसुफ पठाण

युसुफ पठाण हा एक निवृत्त भारतीय क्रिकेटपटू व विद्यमान लोकसभा सदस्य आहे. तो २०२४ लोकसभा निवडणुकाांमध्ये पश्चिम बंगालच्या बहरामपूर मतदारसंघातून अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसतर्फे १८व्या लोकसभेवर निवडून आला. त्याने सलग पाचवेळा निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या अधीर रंजन चौधरी ह्यांचा पराभव करून आपली पहिलीच निवडणुक जिंकली.

राजकारणात प्रवेश करण्याअगोअदर युसुफ पठाण एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. त्याने भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना ५७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८१० धावा काढल्या व ३३ बळी घेतले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद ह्या तीन क्लब संघांकडून खेळला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →