योहानी डिलोका डी सिल्वा (सिंहला: යොහානි දිලෝකා ද සිල්වා; जन्म ३० जुलै १९९३), ही योहानी म्हणून प्रसिद्ध असलेली एक श्रीलंकन गायिका, गीतकार, रॅपर, संगीत निर्माती आणि युट्युबर आहे. ती टिकटॉक वर प्रसिद्ध आहे आणि संगीत वाद्ये आयात आणि निर्यात करणारी एक व्यावसायिक महिला आहे.
तिने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात युट्युबर म्हणून सुरुवात केली. तिने लवकरच तिच्या 'देवियांगे बारे'च्या रॅप कव्हरसाठी ओळख मिळवली आणि तिच्या गायन आणि रॅपिंगची अनेक कव्हर प्रकाशित केली ज्यामुळे तिला श्रीलंकेची "रॅप राजकुमारी" ही उपाधी मिळाली. तिने खास प्रसिद्धी मिळवली ती तिच्या "माणिके मागे हिथे" ह्या गीतासाठी तिला जागतिक लोकप्रियता मिळाली.
ती यूट्यूबवर ३.१४ दशलक्ष सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणारी पहिली श्रीलंकन गायिका देखील ठरली आहे. एका मुलाखतीत योहानी म्हणाली की तिला बॉलिवूड गाणी खूप आवडतात.
योहानीला बॉलीवूडमध्ये गाणी गाण्याची इच्छा असल्याने तिने हिंदीही शिकली आहे. ती इच्छा ज्या दिवशी व्यक्त केली, त्यादिवशी तिची इच्छा काही दिवसांतच पूर्ण झाली. तिने २९ सप्टेंबर २०२१ रोजी शिद्दत या बॉलिवूड चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले.
योहानी
थोडक्यात पण महत्त्वाचे.