नाटू नाटू

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नाटू नाटू

नाटू नाटू हे तेलुगू भाषेतील एक गाणे आहे, जे एमएम कीरावानी यांनी आरआरआरच्या साउंडट्रॅकसाठी संगीतबद्ध केले आहे. गीत चंद्रबोस यांनी लिहिले असून राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांनी गायले आहे. या गाण्याची लिरिकल आवृत्ती १० नोव्हेंबर २०२१ रोजी लाहरी म्युझिक आणि टी-सीरीजद्वारे प्रदर्शित झाली. तर संपूर्ण व्हिडिओ गाणे ११ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाले.

हे गाणे हिंदीमध्ये "नाचो नाचो" म्हणून, तमिळमध्ये "नाट्टू कूथू", कन्नडमध्ये "हल्ली नाटू" आणि मल्याळममध्ये "करिंथॉल" म्हणून प्रसिद्ध झाले. या गाण्यातील एनटीआर जुनियर आणि राम चरण एकत्र नाचत असलेली हुक स्टेप लोकप्रिय झाली. ८० व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारे हे पहिले आशियाई तसेच पहिले भारतीय गाणे ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →