श्रीवल्ली (तेलुगू गीत)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

श्रीवल्ली हे पुष्पा: द राइज (२०२१) या तेलुगू चित्रपटातील एक गीत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे आणि यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हे गाणे देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केले तर चंद्रबोस यांनी ते लिहिले आहे. चित्रपटाचे मूळ गाणे तेलुगूमध्ये आहे, जे सिड श्रीराम यांनी गायले. मल्याळम, तमिळ, हिंदी आणि कन्नडमध्ये या भाषांमध्येही हे गाणे तयार केले गेले. हे गाणे सिड श्रीराम यांनी चार भाषांमध्ये तर जावेद अली यांनी हिंदीत गायले. या सर्वच भाषांमध्ये हे गाणे प्रचंड गाजले.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यावर हे गाणे चित्रित झाले आहे. हे गाणे म्हणजे पुष्पाराज या नायकाच्या श्रीवल्ली या नायिकेबद्दल असणाऱ्या भावनांची अभिव्यक्ती आहे.

हे गाणे प्रचंड गाजले असून या गाण्यासाठी या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट मूळ तेलुगुपेक्षा हिंदीत जास्त लोकप्रिय झाला. या गाण्याने देशभरातील लोकांना प्रभावित केले. या गाण्याने अनेक विक्रम मोडले. गाणे प्रसिद्ध झाल्यावर लगेच ट्विटरवर लगेच "श्रीवल्ली"चा ट्रेंड सुरू झाला.

विविध समाजमाध्यमांवर या गाण्याचे अनेक व्हिडीओ तयार केले गेले. भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेट खेळाडू ईशान किशन आणि सूर्य कुमार यादव श्रीवल्ली गाण्यावर नाचताना दिसले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →