पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अॅक्शन थरारपट आहे, जो सुकुमार यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे. मुत्तमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने मिथ्री मुव्ही मेकर्सद्वारे याची निर्मिती झाली. यात अल्लू अर्जुन, फहद फासिल (त्याच्या तेलुगु पदार्पणात) आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर जगदीश प्रताप बंदरी, सुनील, राव रमेश, धनंजया, अनसूया भारद्वाज, अजय, अजय, सुनील यांच्या सहाय्यक भूमिका आहेत.
दोन भागांपैकी हा पहिला चित्रपट असून चित्रपटात रेड सँडर्सच्या तस्करी करणाऱ्या कुलीची कथा आहे. एक दुर्मिळ लाकूड जे फक्त आंध्र प्रदेश राज्यातील शेषाचलम येथे उगवते, त्याची तस्करी नायक करत असतो.
देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर छायाचित्रण आणि संपादन अनुक्रमे मिरोस्ला कुबा ब्रोझेक आणि कार्तिक श्रीनिवास-रुबेन यांनी केले आहे. मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब केलेल्या आवृत्त्यांसह 17 डिसेंबर 2021 रोजी द राइज तेलुगुमध्ये रिलीज झाला.
चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्रित सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि अल्लूच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखा, अॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शनाची प्रशंसा केली गेली. परंतु कालावधी, अंदाज वर्तवली जाणारी कथा आणि स्कोअरवर टीका केली गेली. द राइज व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर ₹342 कोटींची चित्रपटाने कमाई केली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांमध्ये त्याचा क्रमांक लागतो. पुष्पा: द रुल पार्ट 2 या शीर्षकाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती एप्रिल 2022 मध्ये सुरू होणार आहे.
पुष्पा: द राइझ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.