लौंग लाच्ची (पंजाबी: ਲੌਂਗ ਲਾਚੀ) हे त्याच नावाच्या २०१८ च्या पंजाबी चित्रपटातील एक गीत आहे, जे मन्नत नूरने गायले होते. गाण्यात मुख्य कलाकार एमी विर्क आणि नीरू बाजवा आहेत. हे गीत गुरमीत सिंग यांनी संगीतबद्ध केले तर हरमनजीतने लिहिले.
लौंग लाच्चीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ते इतके गाजले की यूट्यूबवर एक अब्जवेळा पाहिले जाणारे हे पहिले भारतीय गाणे ठरले. इतकी मोठी उंची गाठणारा लाची हा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला होता.
दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत या गाण्याने अनेक विक्रम केले. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे, कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांच्या लुका छुप्पी (२०१९) चित्रपटात देखील ते पुन्हा तयार केले गेले. तू लॉन्ग मैं इलायची असे या गाण्याचे शीर्षक होते.
लौंग लाच्ची (पंजाबी गीत)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.