नोरा फतेही (जन्म:६ फेब्रुवारी, १९९२) ही एक कॅनेडियन नर्तक, मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि निर्माती आहे, जी भारतीय चित्रपट सृष्टीत म्हणजे बॉलीवूड मध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. तिने हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने बॉलिवूड चित्रपट रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत टेम्पर, बाहुबली: द बिगिनिंग आणि किक-२ सारख्या चित्रपटांमध्ये 'मसाला गीत' (आयटम नंबर) करून लोकप्रियता मिळवली आणि दोन मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले, डबल बॅरल आणि कायमकुलम कोचुन्नी.
इ.स. २०१५ मध्ये, ती 'बिग बॉस -९' या वास्तव प्रदर्शनी (रिअॅलिटी शो) मध्ये स्पर्धक होती आणि ८४व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले. इ.स. २०१६ मध्ये तिने वास्तव नृत्य प्रदर्शनी 'झलक दिखला जा' मध्ये भाग घेतला. ती सत्यमेव जयते या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसली, ज्यात ती "दिलबर दिलबर दिलबर" गाण्याच्या 'पुनर्निर्मित आवृत्ती'मध्ये दिसली. या पुनर्निर्मिती गाण्याने प्रसारणाच्या (रिलीजच्या) पहिल्या २४तासात यूट्यूबवर २०दशलक्ष दृश्ये ओलांडली. यूट्यूबवरील हे पहिले हिंदी गाणे बनले आहे ज्याने भारतात अशी प्रसिद्धी मिळवली. तिने मोरक्कन हिप-हॉप ग्रुप फनेअर सोबत "दिलबर दिलबर दिलबर" गाण्याची अरबी आवृत्ती प्रदर्शित करण्यासाठी देखील सहकार्य केले. २०१९ मध्ये, तिने टांझानियन संगीतकार आणि गीतकार 'रायवानी' यांच्या सहकार्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय इंग्रजी गाणे 'पेपेटा' प्रसारित केले.
नोरा फतेही
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!