ही यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय संगीत व्हिडिओंची यादी आहे. चूचू टीव्ही (ChuChu TV) या लहान मुलांच्या वाहिनीचे टू वर्ड्स फोनिक्स गाणे हा भारतातील सर्वाधिक पाहिला गेलेला आणि जगातील ७वा सर्वाधिक पाहिला जाणारा यूट्यूब व्हिडिओ आहे.
व्हाय धिस कोलावेरी डी हा १०० दशलक्ष अवलोकने (व्ह्यूज) पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. फुक्रा इंसान आणि जिया शंकर यांचा जुद्द्यान हा २०० दशलक्ष आकडेवारी पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला. "स्वॅग से स्वागत" हा ५०० दशलक्ष व्ह्यूज पार करणारा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ होता. "कीड्सटीव्ही हिंदी - नर्सरी राइम्स आणि किड्स गाणी" यांचा "हंप्टी द ट्रेन ऑन अ फ्रूट्स राइड" हा १ अब्ज पार करणारा पहिला हिंदी व्हिडिओ आहे (२६ डिसेंबर २०१९). "खान्देशी मूव्हीज" द्वारे अपलोड केलेला "छोटू के गोलगप्पे" हा भारत आणि जगात १ अब्ज आकडा पार करणारा पहिला बिगर-संगीत आणि मुलांसाठी नसलेला व्हिडिओ आहे. १ अब्ज आकडा पार करणारा हा भारतातील आणि जगातील पहिला कॉमेडी स्किट व्हिडिओ आहे.
२४ मे २०२२ पर्यंत, भारतातील ३८ व्हिडिओंनी १ अब्ज व्ह्यूज ओलांडले आहेत.
सर्वाधिक पाहिलेल्या भारतीय यूट्यूब व्हिडिओंची यादी
या विषयातील रहस्ये उलगडा.